

आळंदी देवाची
१. माऊली पादुका अभिषेक
२. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी देवाची आयोजित वारकरी सांप्रादायिक भक्ति ज्ञान योग शिभिर समारोप आणि मुलांना मार्गदर्शन
३. इंग्रजी भाषेत कीर्तन सेवा - बहुभाषिक कीर्तन मोहोत्सव , आळंदी
![]() | ![]() | ![]() | ![]() |
---|---|---|---|
![]() |
एम येस ऑलिव्ह हाऊसिंग सोसायटी, आंबेगाव येथे नुकताच विठ्ठल रुखमिणी मंदिराचा कलाशारोहण समारंभ पार पडला . त्या निमित्ताने माझी प्रवचन सेवा पांडुरंग आणि रुखमिणी आईसाहेब यांच्या चरणी रुजी झाली.
![]() | ![]() | ![]() | ![]() |
---|---|---|---|
![]() |
काला कीर्तन , मंदोडे , ता. मुळशी भगवंताच्या लीला सांगणे म्हणजे साक्षात वाचा शुद्धी
![]() | ![]() | ![]() | ![]() |
---|---|---|---|
![]() |
जिवणे बंदर, श्रीवर्धन कीर्तन सेवा.. अतिशय सुंदर प्रतिसाद सांप्रदायातली खरी शिस्त पहायची असेल तर आवर्जून उपस्थिती लावावी अशी सेवा आहे . आठवण खूप मन सुखावणारी
काल एकादशी असल्यमुळे आमची दिंडी ‘संत विचार प्रबोधिनीच्या ’ वतीने ‘हरिपाठ महायज्ञाचे’ आयोजन ओडीला , लोहिया जैन ग्रुप , बाणेर , पुणे येथे आयोजित करण्यात आला होता . आमच्या दिंडीतले कुलकर्णी दांपत्य बरेच दिवस अमेरिका येथे मुलाकडे होते. भारतात आल्यावर पहिल्याच आठवड्यात त्यांनी आग्रह पूर्वक हरिपाठ महायज्ञाची वेळ मागून घेतली आणि काल अतिशय सुंदर वातावरणात तो संपन्न झाला.
दर शुद्ध एकादशीला आम्ही सामुहिक हरिपाठ आमच्या दिंडीच्या वतीने ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने करतो . शहरी भागात, बुद्धिजिवी वर्गात वारकरी संप्रदाय उत्तम पध्दतीने रुजावा म्हणून हा हरिपाठ महायज्ञ.
ह.भ.प. मणिलाल काका यांच्या प्रथम पुण्यस्मरण कीर्तन सेवा , कडधे, राजगुरुनगर, पुणे.
सद्गुरू जंगली महाराज मंदीर, पुणे येथे प्रतिवर्ष्याप्रमाणे माझी प्रवचन सेवा संपन्न झाली . आमचे बाबा अनेक वर्ष येथे सेवा रुजू करत असे.
सद्गुरू जंगली महाराज मंदीर, पुणे येथे प्रतिवर्ष्याप्रमाणे माझी प्रवचन सेवा संपन्न झाली . आमचे बाबा अनेक वर्ष येथे सेवा रुजू करत असे.
शहरी भागामध्ये वारकरी संप्रदाय आणि संत विचार रुजावेत या हेतुने आम्ही ‘हरिपाठ महायज्ञाची’ सुरुवात केली आहे . आमच्या दिंडीच्या म्हणजेच संत विचार प्रबोधिनीच्या वतीने हा उपक्रम आम्ही राबवतो. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला रात्री ८ ते ९ या वेळेत , कोणाच्यातरी घरी अथवा आमच्या घरी आम्ही काही भगवतभक्त एकत्र येऊन सामुहीक हरिपाठ गायन करतो. त्याचबरोबर मी ज्ञानेश्वरीवर १५ मिनिटे प्रवचन सेवा करतो. हा उपक्रम ऑनलाइन मोड मध्ये सुद्धा चालतो . आमच्या दिंडीचे बरेच वारकरी हे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन इत्यादि देशात आहेत . त्याचबरोबर काही वारकरी हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आहेत. काही पुण्याच्या बाहेरचे आहेत. त्यांच्यासाठी हा ऑनलाइनचा पर्याय.
मागच्या एकादशीला , श्री जहागिरदार कुटुंबिय, बावधन यांच्या घरी हा हरिपाठ महायज्ञ संपन्न झाला .
आम्ही आग्रहाने हा उपक्रम घरीच करायला लावतो जेणेकरुन आपल्या घरात हरिपाठाचे शब्द घुमतील आणि संपूर्ण घर शब्दांनी पावन होईल. शब्द ही संतांनी दिलेली खरी देणगी आहे .
पालखी विठोबा मंदीर, भवानी पेठ कीर्तन सेवा . या मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रतिवर्षी उतरते.. माऊली ज्या ठिकाणी विश्रांती घेते त्या ठिकाणी सेवा कारणे म्हणजे भाग्यच .
रविवार , दिनांक १० मार्च २०१४ रोजी श्री क्षेत्र आळे येथे कीर्तन सेवा संपन्न झाली . ज्ञानेश्वर माऊलींनी पैठण येथे रेड्या मुखी वेद वदविले आणि त्या रेडेश्वराला क्षेत्र आळे येथे समाधी दिली.
महाराष्ट्रात अश्या काही ठिकाणी दिव्यत्वाची प्रचिती येते आणि आत्मानुभूतीची जाणीव होते . त्यातलं हे एक तीर्थ क्षेत्र.
अर्थातच कीर्तन अतिशय सुंदर झाले आणि प्रचंड पण शांत जनसमुदाय उपस्थित असल्यामुळे कीर्तनाला वेगळाच रंग चढला. कीर्तनाला मा. आमदार अतुलशेठ बेनके यांची विशेष उपस्थिती लाभली.
माऊलींची अशीच कृपा राहो ही प्रार्थना.
विशेष आभार - सांजूशेठ कुऱ्हाडे
नुकतीच अकोले, संगमनेर येथील अगस्ती ऋषींच्या सांनिध्यात माझी कीर्तन सेवा रुजू झाली प्रचंड संखेने उपस्थित असणारे भगवत भक्त आणि महाशिवरात्रीचा पर्वकाळ या दोन्हीही गोष्टींनी मी मोहरून गेलो.
काल महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला प्रतिवर्षाप्रमाणे देखणे कुटुंबियांची आमच्या गावी म्हणजेच श्री क्षेत्र करेगाव येथे कीर्तन सेवा झाली. त्यांनंतर रात्री १२ वाजता देखणे कुटुंबीयांचा पाहिला अभिषेक संपन्न झाला . साक्षात काशी विश्वनाथ करेगाव या गावी प्रगट झाले आहेत आणि म्हणूनच गावाला करेगाव हे नाव पडलं अशी एक छान आख्याईका आहे. याच कारेश्वरच्या गाभाऱ्या समीर देखणे घराण्यातील सत्पुरुष ह. भ. प. बाबाजी महाराज देखणे यांची संजीवन समाधी आहे . कारेगाव मधल्या कीर्तन सेवेमुळे आम्हाला कारेश्वर भगवान, बाबाजी महाराज देखणे आणि आमच्या परंपरेची प्रतिवर्षी सेवा करता येते याचा आनंद आहे .
प्रतिवर्षाप्रमाणे समस्त कारेगाव ग्रामस्थांनी प्रचंड संख्येंने उपस्थित राहून पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रेम नेहमीच मला संप्रदायाची सेवा करायचे खूप बळ देते.
प्रसिद्ध यू ट्यूबर सौ अनुराधा तांबोळकर यांनी लिहिलेल्या ‘ आपली संस्कृती आपले सणवार’ या अतिशय सुंदर आणि आशय संपन्न अश्या महत्त्वाच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी माझ्या हस्ते झाले . प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीपजी वेलणकर तसेच ‘बाईपण भारी देवा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी - मोने उपस्थित होत्या. भारतीय आणि मराठी संस्कृती माझा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय असल्यमुळे संस्कृती, सणवार, प्रथा - परंपरा आणि रुढी यातल फरक , त्यातील रूपके आणि अश्या अनेक विषयांवर खूप छान चिंतन मांडता आले . तांबोळकर हे घर डॉक्टरांचे घर म्हणून ओळखले जाते कारण घरातले सगळेच वैद्यकीय व्यवसायात आहेत , म्हणून साहाजिकच समोर श्रोत्यांमध्ये बरेच प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित होते. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची संपूर्ण कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती खूप सुखावह होती.
काल सासवड येथे सांस्कृतिक कार्य विभाग , महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी , पुणे आयोजित महासंस्कृती मोहोत्स्तव २०२४ मध्ये ‘ डॉ रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान ‘ प्रस्तुत ‘. बहुरूपी भारूड हा आमचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मोहोत्सवाचे अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन केले होते.
प्रेक्षकांचा कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.
परवा गो रक्षक शिवशंकर स्वामी यांनी केलेल्या प्रचंड कामाचे जवळून दर्शन घेतले . ओंकारेश्वर मंदिर, पुणे येथे गो रक्षकांच्या आरती मध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले . त्या निमित्ताने गो मातेविषयी आणि तिची सेवा हे किती मोठे व्रत आहे हे उपस्थितांना सांगितले तसेच आमच्या घरी अनेक वर्ष असणाऱ्या ‘बहुळा’ गायीच्या आठवणी जागृत केल्या .
सोबत होते पुण्यनगरीचे माजी महापौर मुरली अण्णा मोहोळ , प्रसिद्ध वास्तू तज्ञ आनंदजी पिंपळकर आणि प्रचंड संखेने हजर असलेली गो रक्षकांची फौज.
विशेष आभार - ह. भ. प पुरुषोत्तम दादा पाटील, आळंदी देवाची
दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी चाळीसगाव, जळगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषद , चाळीसगाव शाखा यांनी माझी प्रवचन सेवा आयोजित केली होती. गाडगे महाराज यांच्या नवाने ही व्याख्यान मला असल्याने महराजांच्यावर खूप छान भाष्य करता आले . माझा अतिशय आवडीचा विषय असल्यमुळे गाडगे बाबांवर खूप अभ्यासू विचार मांडता आले . गाडगे बाबांच्यासारखे सत्पुरुष या महाराष्ट्रात निर्माण झाले म्हणून महाराष्ट्राला एक वेगळी सामाजिक दृष्टी लाभली . पू. साने गुरुजी , गाडगे महाराज , तुकडोजी महाराज आणि विनोबा भावे ही आमची दैवते आहेत असे माझे वडील डॉ देखणे सर नेमही म्हणायचे याचा पुनःश्च प्रत्यय आला .
ऐरोली दीवा कोळीवाडा, मुंबई कीर्तन. प्रचंड सुंदर प्रतिसाद आणि छान श्रोते..
काल भागवत धर्म प्रचारक अमृतनाथ स्वामी महाराज पुण्यतिथी ऊत्सव , क्षेत्र आळंदी देवाची येथे कीर्तन सेवा रुजू करण्याचा योग आला . गेली ५६ वर्षे हा उत्सव अतिशय भक्तियुक्त वातावरणात पार पडतोय. २ दिवस प्रचंड ताप आणि अशक्तपणा असून देखील माऊलींच्या कृपेने सेवा उत्तम रित्या सादर करता आली .
आमचे मित्र ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे उत्तम नियोजन आणि नम्रतपूर्वक केलेले आदरातिथ्य लक्षात रहाण्यासारखे आहे . त्यांचे खूप आभार .
आमचे मित्र ज्ञानेश्वर मेश्राम ( झेंडा फेम) यांची गायन साथ कीर्तनाला लाभली , त्यामुळे अजून रंग चढला .
पूर्व जन्मीचे सुकृत म्हणून माऊलीने किती कृपा करावी ..समोर प्रत्यक्ष माऊलींची संजीवन समाधी आणि शेजारी भारतीय अध्यात्म शास्त्र संपूर्ण जगभर पोहोचवणारे सद्गुरू श्री श्री रविशंकर जी अगदी मांडीला मांडी लावून बसलेले ..दोघांच्याही मनामध्ये परमेश्वराविषयीची असीम श्रद्धा..
‘कृपाळू सज्जन तुम्ही संत जन ‘ या अभंगातील ओळीचा विचार सहज मनात येतोय आणि डोळे का पाणावतायेत हे समजत नाहीये . कृपेचे वैभव मोजता येत नाही हेच खरे.
आज क्षेत्र आळंदी येथे , गोविंदगिरी जी महाराज , कोषाध्यक्ष - राम मंदीर , अयोध्या यांचे स्वागत करायचे भाग्य मिळाले .